आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



।। आचार्य जयंती : नगर देवस्तानातील ।।


वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले अशा आचार्यांना पूज्यपाद मानण्यासाठी, आचार्यांची सेवा करण्यासाठी, श्रीदत्तात्रेय निवासामध्ये त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात तरी निदान आपल्या देवास्थानाशिवाय शंकर जयंती उत्सव विशेष करून कुठेही साजरा होत नाही. वास्तविक पाहता आपली मूळ परंपरा किंवा संप्रदाय हा श्रीदत्तात्रेयांचा. आत्तापर्यंत या परंपरेत अनेक साक्षात्कारी पुरुष होऊन गेले आहेत, पण कोणाच्याही वाटयाला हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली नाही. या उत्सवाची परंपरा सुरु होण्याचे मूळ कारण असे की, आमच्याच गुरूंना, श्रीमन नृसिंहसरस्वती स्वामींना, आसे वाटले की जगद्गुरु श्रीशंकराचार्यांनी या ठिकाणी यावे व उत्सवाची परंपरा सुरु करावी. याचा अर्थ असा की त्यांच्या परंपरेशी आपली परंपरा जुळते आहे, ती एकाच आहे.

येथील प्रसन्न वातावरण आणि या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीगुरुमहाराजांच्या पादुका उमटलेल्या आहेत, हे सर्व लक्षात घेऊन श्रृंगेरी पिठाच्या श्रीशंकराचार्यांनी आपल्याला हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करावा अशी आज्ञा केली. आद्य श्रीशंकराचार्यांचे अधिष्ठान म्हणून आपल्याला त्यांनी आचार्याची मूर्ती, तसेच शिवलिंगही दिले आहे. शिवाचे सर्व गुण सामावलेल्या शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे. श्रृंगेरी पीठाचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ स्वामी यांनी उत्सव साजरा करण्याचे लेखी आज्ञापत्रही दिले आहे.

श्रीमद् आद्य श्रीशंकराचार्य जयंती हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध पंचमी असा होतो. यानिमित्त निरनिराळ्या विद्वानांना येथे बोलावून त्यांचे आपल्या धर्माबद्दलचे, संस्कृतीबद्दलचे विचार प्रकट करून आपण ज्ञानसत्र चालवत आसतो. तसेच आपण या दिवशी आचार्यांच्या प्रतिमेची पालखी काढून हा उत्सव सोहळा साजरा करतो. याशिवाय प्रत्येक सत्संग मंडळात सुद्धा हा उत्सव साजरा होतो. या प्रसंगी तुम्ही श्रीमद् आद्य श्रीशंकराचार्यांचे तत्वज्ञान एकले पाहिजे. त्यांना अभिवादन केले पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे. तसेच या दिवसात जमेल तेव्हा एकदा तरी दर्शनाला तुम्ही सर्वांनी येऊन जावे. कारण त्या काळात त्यांचा वास येथे आसतो.

अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चरचरम ।

तत्पदं दर्शितं येन, तस्मे श्री गुरुवे नम: ।।

वाचा: शंकराचार्य जीवन चरित्र

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy